आ.रोहित पवार साधणार आज तरुणाईशी संवाद…… असा आहे बीड जिल्हा दौरा

बीड दि.१६ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे माजलगावमधील  सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आज दि.१६ जानेवारी शानिवार रोजी दुपारी २ वाजता तरुणाईशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जयसिंग सोळंके (Jaysing Solanke) यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युथ आयकॉन आ. रोहित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी ९ वाजता बीड येथे ते जिल्हा परिषदेचे बांधकाम अर्थ व नियोजन सभापती जयसिंग सोळंके यांच्या रत्नसुंदर निवासस्थानी येतील. ९.४५ वाजता ढेकणमोहा तर १०.४५ वाजता वडवणीत सदिच्छा भेट देतील. सकाळी ११ वाजता माजलगाव येथे पत्रकारांच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता माजी मंत्री आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्या निवासस्थानी राखीव वेळेत उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी २ वाजता शहरातील  सुंदरराव सोळंके  महाविद्यालयामध्ये ‘संवाद तरुणाईशी’  या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधणार आहेत. महाविद्यालयीन तरुणांशी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) संवाद साधून त्यांचे प्रश्न समस्या तरुणा समोरील आव्हाने, तरुणा समोरील समस्या आदी  विषयावर चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शेवटी ३.३० वाजता माजलगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. संवाद तरुणाईशी या कार्यक्रमाला तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जि. प. सभापती जयसिंग सोळंके (Jaysing Solanke) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!