कोरेगाव भीमा जयस्तंभाबाबत उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

कोरेगाव भीमा: दि.१ जानेवारी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील जय स्तंभाला आज सकाळी अभिवादन करण्यात आले. कोरेगाव भीमा लढाईत सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला आजही सार्थ अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजूर करा अशी मागणी आहे. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले की, सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. कोरेगाव भीमा (Koregoan Bhima) ठिकाणाचा विकास आराखडा मंजुर करा अशी मागणी अनेक दिवसांपासून आहे. या जयस्तंभाच्या जवळच्या जागा ताब्यात घेण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या जागा खाजगी मालकीच्या आहेत. त्या जागा मालकांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि या जागा ताब्यात घेतल्या जातील. मी पालकमंत्री आहे आणि अर्थमंत्री देखील आहे. या विकास आरखड्यासाठी आर्थिक बाजू देखील योग्य प्रकारे सांभाळली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही याची ग्वाही देतो, असं अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले. कोरेगाव भीमा (Koregoan Bhima) जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरुनच जयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावे. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.