कोरोंना विशेष

धारुर शहरात दोन तर जिल्ह्यात ५० पॉझिटीव्ह

बीडःदि.३१ जूलै- आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज ५० ने वाढला आहे. आजच्या अहवालात धारुर शहरात पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील एकावर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरु असुन एक खाटीक गल्लीत असल्याचे कळाले. आरोग्य विभागाने बाधितांच्या संपर्कातील कॉन्टॕक्ट ट्रेसिंग सुरु केली आहे.

आज रात्री आलेल्या अहवालानुसार बीड शहरात २६ , परळी शहरात १४, अंबाजोगाई ४ व गेवराईत ३ माजलगाव १ व धारुर २ अशी ५० पॉझिटीव्ह आढळली आहेत. तर धारुर शहरात कसबा विभागात एक व खाटीक गल्लीत एक अशा २ नवीन रुग्णांची भर पडली आहे. धारुरमध्ये आढळून आलेल्या नवीन रुग्णामुळे धारुरकरांची धाकधूक वाढली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील कंटेनमेंट झोन उठवण्याची मागणी होत असताना शहरात दोन नवीन कंटेनमेंट झोन जाहीर होत आहेत. जून्या रुग्णाचा सोर्स अद्याप मिळाला नसताना कुठलाही प्रवासाचा इतिहास नसणारे आणखी दोन रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!