वस्तीवर दरोडेखोरांचा हैदोस; दोन महिलांवर सामुहिक बलात्कार करत रोख रक्कमेसह मोबाईल पळवले.

औरंगाबाद दि.20 अॉक्टोंबर – औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यात धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमधल्या पैठण (Paithan) तालुक्यातील एका गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने एका वस्तीवर हल्ला चढवला. यावेळी दरोडेखोरांनी दोन महिलांवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

(Haidos of robbers on the settlement; Two women were gang-raped and their mobile phones were snatched along with cash.)

काल (दि.19) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 दरोडेखोरांनी (robbers) पैठण तालुक्यातील एका शेत वस्तीवर हल्ला चढवला. वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवलं. तसंच कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर एका 23 वर्षीय आणि एका 30 वर्षीय महिलेवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला.

यानंतर घरातली रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले. या घटनेने पैठण हादरलं असून घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी (Police) तपास सुरु केला आहे. या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पीडित महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!