कोरोंना विशेष

तिसऱ्या लाटेबाबत आयआयटी दिल्लीचा इशारा; दुसऱ्या लाटेपेक्षा 60 टक्के रुग्ण वाढीचे संकेत!

नवी दिल्ली दि.30 मे – अनेक नवनवीन संशोधन व दाव्यानंतर आता आयआयटी दिल्लीने एक अहवाल (Report) सादर केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. तिसऱ्या लाटेत कोरोना (Third wave of corona) रुग्णांची संख्या दररोज 45 हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यातील दररोज 9 हजाराहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज असेल. हा रिपोर्ट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिल्ली उच्च न्यायालयात (high court) जमा करण्यात आला आहे.

(IIT Delhi warns of third wave; Signs of 60 percent patient growth over second wave!)

देशात जवळजवळ पंधरा महिन्यापुर्वी कोरोना विषाणू संसर्ग (corona infection) आढळून आला. या महामारीच्या दहशतीत अख्ख जग असताना अद्यापही ठोस संशोधन करण्यात अपयश आलेले आहे. भारतात सध्या दुसरी लाट उसळलेली असून वेगवेगळ्या संस्था या महामारीच्या संशोधन व अभ्यासात आपले दावे प्रतिदावे सादर करत आहेत.

यापूर्वीही जागतिक आरोग्य संघटनेसह विविध देशातील प्रमुख संशोधन संस्था, विद्यापिठांनी व शास्त्रज्ञांनी कोरोनाबाबत आपला अहवाल (Report) सादर केला आहे. यात वेगवेगळी मते नोंदवन्यात आली आहेत. असाच एक अहवाल दिल्ली आयआयटीने उच्च न्यायालयात (high court) सादर करत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दर्शवला आहे.

या रिपोर्टनूसार कोरोनाच्या संसर्गामुळे (corona infection) 944 मॅट्रीक टन ऑक्सीजनची दररोज आवश्यकता असणार आहे. न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, या रिपोर्टच्या अनुसार सरकारने आवश्यक ती पावलं उचलावी. शतकातून एकदा येणाऱ्या महामारीशी आपण मुकाबला करीत आहोत. शेवटची महामारी 1920 मध्ये आली होती. येणाऱ्या कोरोना लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सीजनची (oxygen) निर्मिती प्राध्यान्याने वाढवणं गरजेच असणार आहे.

अहवालात दुसऱ्या लाटेहून 60 टक्के अधिक रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेत (Third wave of corona) असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आयआयटी दिल्लीच्या (IIT Delhi) रिपोर्टमध्ये 3 परिस्थितींबाबत उल्लेख केला आहे. त्यानुसार सरकारी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे.

आयआयटी दिल्लीचा (IIT Delhi) अंदाज.
1 रुग्णांची संख्या, ऑक्सीजनच्या (oxygen) गरजेचं अनुमान
2 नवीन रुग्णसंख्येच्या प्रमाणात सुविधा वाढवण्याचे आव्हान
3 रुग्णांच्या संख्येत 60 टक्के अधिक वाढ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!