कोरोंना विशेष

मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठन व प्रार्थना करावी

मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

नाशिक दि.२५(वि.प्र.) पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. मात्र जगभरात आणि देशात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरु आहे. दुर्दैवाने यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडत असून हजारो लाखो लोक यामुळे आजारी पडत आहे. अशाप्रसंगी हा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून एकच उपाय आहे तो म्हणजे गर्दी नकरणे, एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काम करणे या माध्यमातूनच त्याच्यावर आळा घातला जाऊ शकतो. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात नमाज पठन व इतर धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येऊन जर धार्मिक कार्यक्रम केले तर धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण बाहेर न पडता आपल्या घरातच राहून नमाज पठण व प्रार्थना करावी. त्यामुळे स्वतः सोबतच इतरांनाही याचा फायदा होईल.तसेच धर्मगुरूनी देखील रमजान महिन्यात घरात राहून नमाज पठाण करावे. असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

रमजानच्या कामात प्रशासनाच्या वतीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. रमजानच्या काळात फळांची तसेच अत्यावश्यक साहित्याची दुकाने वेळेत उघडतील याठिकाणी देखील सर्व बांधवांनी गर्दी न करता अंतर पाळूनच खरेदी करावी. त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण यश मिळवू शकतो. यासाठी पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये आपण घरात राहूनच नमाज पठन व प्रार्थना करूया. असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!