धारुरलगत पहाटे चोराचा धुमाकूळ. महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवले.

4 / 100

किल्लेधारूर दि.4 जुलै – धारुरलगत पहाटे चोराचा धुमाकूळ दिसून आला. आज सोमवार दि.4 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र.548 सी वरील धारूर ते तेलगाव या दरम्यान धारुर आरणवाडी साठवण तलावाच्या जवळ राहणारे अशोक मच्छिंद्र चव्हाण यांच्या घरी अज्ञात चोरट्याने महिलेच्या अंगावरील 35 हजारांची सोन्याचे दागिने पळवल्याची घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी पहाटेच्या वेळी चोरी करण्याच्या हेतूने अज्ञात चोरट्याने अशोक मच्छिंद्र चव्हाण यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या आईला धमकावत तिच्या अंगावरील सात ग्राम अंदाजे किंमत 35 हजार रुपयांचे सोने लंपास केले. चोरी करुन हा चोरटा मोटारसायकल वरुन पसार झाला. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.

धारूर तेलगाव रस्त्यावर आरणवाडी तलावाच्या जवळ स्वतःचे दुकान व घर असणाऱ्या अशोक मच्छिंद्र चव्हाण यांच्या घरात समोरील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांची आई झोपल्या होत्या. सोमवारी पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्याने या शेडमध्ये प्रवेश करून बाहेर झोपलेले तक्रारदाराची आई निर्मला मच्छिंद्र चव्हाण यांना उठवले व त्यांना धमकावत त्यांच्या अंगावरील मंगळसूत्र व नाकातील सोन्याची नथ असे सात ग्राम सोन्याचे दागिने (gold ornaments) काढून घेतले. यावेळी महिलेने आरडाओरड केल्यानंतर हा चोरटा पसार झाला.

महिलेने ओरडा ओरड करताच घरातील इतर मंडळी जागा होऊन या चोरट्याचा तेलगाव रस्त्याला पाठलाग केला. मोटरसायकल क्रमांक एम एच 15 ई के 1871 या पॅशन प्रो गाडीवर चोरटा पसार होताना दिसला. रस्त्यावर त्याला अडवले असता चोरट्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवत पसार होण्यास तो यशस्वी झाला. या परिसरात चोरीचे प्रकार वाढले असून नेहमीच घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे या भागातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरी प्रकरणी अशोक मच्छिंद्र चव्हाण यांच्या तक्रारीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

( Early morning burglary near Dharur. The woman was robbed of gold ornaments. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!