
बीडः दि.११(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात आज पाठवण्यात आलेल्या ७१७ स्वॅब पैकी २८६ अहवाल प्राप्त झाले असून यात ९ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. ४३१ अहवाल आणखी प्रलंबित आहेत. दररोज मिळत असलेल्या अहवालात बीड जिल्ह्याच्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसुन येत आहे. आज माजलगावमध्ये एक रुग्ण आढळून आला.
आज पाठवण्यात आलेल्या अहवालातिल २८६ स्वॅब ची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. यात आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णात बीड ६, गेवराई, परळी व माजलगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अज आलेल्या अहवालात पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या चौघांचा समावेशा आहे. आज पाठवलेल्या एकुण ७१७ पैकी आणखी ४३१ अहवाल प्रलंबित आहेत. २६९ निगेटिव्ह आली आहेत तर ८ जनांचा अहवाल अनिर्णित आहे.