Raasta Roko.. धारुरमध्ये आज रास्ता रोको ; बस सेवेबद्दल महत्त्वाची अपडेट.

किल्लेधारुर दि. 4 सप्टेंबर – Raasta Roko.. धारुर शहरात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन होत आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून राज्यातील स्फोटक परिस्थिती नंतर बंद असलेली बस सेवा आजपासून काही अंशी सुरु करण्याचा निर्णय धारुर Dharur आगार bus depot प्रमुखांनी घेतला आहे. (Raasta Roko.. Road stop today in Dharur; Important update about bus service.)
जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद राज्यभर उमटून वाहतूक व्यवस्था कोसळली. प्रवासी वर्गाला मोठी अडचण होवून या काळात राज्य परिवहन मंडळाचा कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. यातच शेतकऱ्यांच्या वतीने दुष्काळ जाहिर करावा, पिक विमा crop insurance मंजूर करावा, अग्रिम मिळावा आदी विविध मागण्या संदर्भात आज दि.4 सोमवार रोजी धारुर Dharur शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजता रास्ता रोको Raasta Roko आंदोलनाचे आयोजन विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे बससेवा सुरु होणार की नाही असा प्रश्न धारुर शहरातील प्रवासी वर्गात आहे. यावर प्रभारी आगार प्रमुख भारत कोमटवार यांना माहिती विचारली असता, आज आठवडे बाजार असल्याने वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर स्थानिक पातळीवर काही अंशी बस सेवा सुरु केल्याची माहिती मिळाली. धारुर आगारातून bus depot लांब पल्ल्याच्या गाड्या वगळून तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बीड, माजलगाव, केज, अंबाजोगाई व लातूर अशा बस फेऱ्या होणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.