माझं गाव

धारुरमध्ये रविवारी माजी आ. स्व. विनायकराव मेटे यांना श्रध्दांजली सभेचे आयोजन.

49 / 100

किल्लेधारूर दि.20 अॉगस्ट – धारुरमध्ये रविवारी माजी आ. स्व. विनायकराव मेटे यांना श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मराठा भूषण मराठा आरक्षणाचा बुलंद आवाज नेतृत्व माजी आ. विनायकराव मेटे यांचे नुकतेच अपघातात निधन झाले. त्यांच्या स्मृतीस सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रध्दांजली सभेचे आयोजन दि.21 अॉगस्ट रविवारी सकाळी 11 वाजता सकल मराठा समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण व अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे नुकतेच अपघाती निधन (Accidental death) झाले. स्व.विनायक मेटे यांच्या स्मृतीस अभिवादन व श्रध्दांजली सभेचे आयोजन धारुर (Dharur) येथे रविवारी दि.21 रोजी सकाळी 11 वाजता पं. दीनदयाल उपाध्याय नाट्यगृहात करण्यात आले आहे. या श्रध्दांजली सभेस त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षीय नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज, किल्ले धारूर व धारूरकरांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्व. मेटे यांची अस्थी कलश यात्रा गेवराई तालुक्यात
दि.21 रविवारी व दि.22 सोमवार रोजी स्व.मा.आ. विनायकराव मेटे यांची अस्थी कलश यात्रा गेवराई तालुक्यात खालील गावात येणार आहे. गेवराई तालुक्यातील सर्व नागरिक सर्व पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार बांधव, डॉक्टर असोसिएशन, वकील महासंघ, शिक्षक कर्मचारी, सरपंच, उपसरपंच चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी व सर्व मेटे साहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहुन अस्थी कलशाचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
( In Dharur on Sunday, the former self Tribute meeting organized for Vinayakrao Mete. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!