आज 156… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.26 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3677 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 156 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3521 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s Corona Update in Beed District)
अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-17, अंबाजोगाई-10, आष्टी-36, धारुर-3, गेवराई-24, केज-26, माजलगाव-6, परळी-2, पाटोदा-9, शिरुर-8, वडवणी-15 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. राज्यात नवीन डेल्टा प्लस वेरिअंटचा धोका वाढत असल्यामुळे काल राज्य शासनाने महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात तिसऱ्या स्तरावरचेच निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्हा तिसऱ्या स्तरातच असल्यामुळे निर्बंध कायम राहणार आहेत.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी कोविड-19 चे 9 हजार 677 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या वाढून 60,17,035 राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे. गेल्या 24 तासांत 156 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हा एकूण आकडा 1,20,370 इतका झाला आहे. तर 10 हजार 138 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात कोरोना डेल्टा प्लस वेरिएंटचे 51 नवे रूग्ण सापडले आहे. यामधील सर्वाधिक रूग्ण म्हणजे 22 रूग्ण हे महाराष्ट्रातच सापडले आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 156 मृत्यूंपैकी 117 रूग्णांचा मृत्यू 48 तासांत झाला आहे. तर 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू हा गेल्या एक आठवड्यात झाला आहे.