कोरोंना विशेष

धक्कादायक… कोविड सेंटरमधून चक्क 15 कोरोना बाधित पळाले; जामनेरमधील घटना

जामनेर दि.16 मार्च- जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेरमध्ये गंभीर प्रकार उघडकीस आला असून येथील कोविड सेंटरमधून (Covid Center) 15 कोरोना बाधितांनी (Corona virus) पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जामनेर (Jamner) पोलिसांकडे (Police) तक्रार दाखल केली आहे.

(Shocking … 15 Corona disrupted escape from Covid Center; Incidents in Jamner)

जामनेर येथील कोविड सेंटरमधून 15 कोरोना बाधित रुग्ण पळाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, कोविड सेंटर (Covid Center) मधील सुविधां अभावी रूग्ण पळाल्याची चर्चा आहे. या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची हेळसांड होत असून, या कोविड सेंटरमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे.

वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील लक्ष दिले जात नसल्याने अखेर या कोविड सेंटरमधून कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांनी तिथून पळ काढला, असे सांगितले जात आहे. या फरार रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा तपास पोलीस (Police) करत आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचे 15 हजार 51 नवे रूग्ण गेल्या 24 तासांत वाढले आहेत. यात 48 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 1 हजार 713 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सलग पाचव्या दिवशी राज्यात 15 हजारांहून जास्त रूग्ण वाढले आहेत.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारनं पुन्हा काही निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे. सिनेमागृह हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. तर राजकीय, धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. लग्नासाठी 50 लोकांची तर अंत्यसंस्कारसाठी 20 लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!