कोरोंना विशेष

धक्कादायक… महाराष्ट्रात शनिवारची संख्याही मोठीच;

मुंबई दि.14 मार्च – महाराष्ट्रात (Maharashtra) परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.  राज्यात कोरोनाचा धोका कायम असून गेल्या 24 तासात राज्यात 15 हजार 602 नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर 88 करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन करोना बाधितांची (Corona Positive) संख्या शुक्रवारच्या तुलनेत केवळ 215 ने कमी आहे. शुक्रवारी ही संख्या 15 हजार 817 इतकी होती.

(Shocking … Maharashtra also has a large number of Saturdays;)

गेल्या 24 तासात एकूण 7 हजार 467 कोरोना बाधित रूग्णांना उपचारानंतर डिस्टार्ज देण्यात आला आहे. शनिवारी 11 हजार 344 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यातील कोरोना बाधित (Corona Positive) सक्रिय रूग्णांची 1 लाख 18 हजार 525 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.3 टक्के इतका आहे. तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.49 टक्के आहे.

शनिवारी नोंदवला गेलेला देशभरातील 24 हजार 882 नव्या रुग्णांचा आकडा हा गेल्या 83 दिवसांतील विक्रमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. याआधी 20 डिसेंबर 2020 रोजी 26 हजार 624 नवे रुग्ण दाखल झाले होते. देशातील एकूण रुग्णसंख्या आता 1 कोटी 13 लाख 33 हजार 728 वर पोहोचली असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 9 लाख 73 हजार 260 इतकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!