धनेगाव धरण भरण्याच्या उंबरठ्यावर; आज होणार धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन

बीडः दि.२६(प्रतिनिधी) केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प Manjra Dam लातुर व बीड जिल्ह्याची तहान भागवते. गतवर्षी मृत साठ्यात असलेले हे प्रकल्प यंदा ९८ टक्क्याच्या पुढे सरकले आहे. आज दि.२६ रोजी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde धनेगाव ता.केज येथे जावून जलपूजन करणार आहेत.

गेल्या चार वर्षातील सततच्या अवर्षणामुळे मांजरा प्रकल्पातील Manjra Dam जलसाठा अत्यंत कमी झाला होता. तीन वर्ष मृतसाठ्यात असलेला मांजरा प्रकल्प यंदा आक्टोंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे भरण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. आज रोजी पर्यंत प्रकल्पात ९८.९५ एकुण जल साठा नोंदवण्यात आला आहे. तीन जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या या प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाल्याने आज दि.२६ आक्टोंबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या हस्ते जलपूजन होत आहे.

अशी आहे प्रकल्पाची आजची स्थिती

मांजरा प्रकल्प (Manjra Dam)
दिनांक 26 आक्टोबर 2020 सकाळी 6

एकूण साठा- 221.756 दलघमी
उपयुक्त साठा- 174.626 दलघमी
पाणी पातळी- 642.32 मी
एकूण साठा- 98.95%
उपयुक्त साठा- 98.68%

1 जून पासून आवक- 2.0/218.941 दलघमी

प्रकल्पीय
एकूण साठा- 224.09 दलघमी
उपयुक्त साठा- 176.96 दलघमी
मृत साठा- 47.130 दलघमी
पूर्ण संचय पातळी- 642.37 मी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!