धारुरमधील आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर)- आज दुसऱ्या दिवशीही संख्या समाधानकारक आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये फक्त चौघांची ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आली. यातील दोघे रुग्ण पॉझिटीव्ह आढळली आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेली दोन्ही स्वॅब अहवाल निगेटिव्ह आली आहेत.
गेली दोन दिवसात केवळ सात ॲन्टीजन तपासण्या झाल्या तर स्वॅब (Swab) नमुनेही अत्यंत कमी पाठवण्यात आली आहेत. आज केवळ ४ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात २ पॉझिटीव्ह आढळले तर कालची दोन्ही स्वॅब (Swab) नमुने निगेटिव्ह आली आहेत. आज केवळ २ जनांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन (Antigen)
१. ७६ वर्षीय पुरुष, डोंगरवेस, धारुर
२. ३४ वर्षीय पुरुष, पारगाव, ता. धारुर
यांचा समावेश आहे.