अबब 2 कोटी रुपये लाचेची मागणी! 10 लाख स्विकारताना पोलिस कर्मचारी ताब्यात.

परभणी दि.24 जुलै – अपघाताच्या (Accident) एका प्रकरणात मदत करण्यासाठी 2 कोटींची मागणी करून त्यातील 10 लाखांची रक्कम स्विकारताना मुंबई (Mumbai) येथील लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अखत्यारित काम करणाऱ्या पोलीस (Police) कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यासह दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Demand for Rs 2 crore bribe! Police personnel detained while accepting Rs 10 lakh.)

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनूसार, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत 3 मे 2021 रोजी एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाल्याने दि.9 जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलून, ‘तुझी व्हायरल (viral) झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. यातून तुला बाहेर पडायचे असेल तर तू मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील’ असे सांगितले. तसेच कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) कार्यालयात दि.22 जुलै रोजी तक्रार दिली. या तक्रारीनुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. 23 जुलै रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी करून तडजोडीत, त्यातील 1 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

त्यानंतर काही वेळातच तक्रारदाराच्या भावाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना 10 लाख रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी सेलू येथील पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी (Subdivisional Police Officer) राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात आज शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!