धारुरात आंदोलनस्थळी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका; अंबाजोगाईला हलवले.

किल्लेधारूर दि.15 जानेवारी – एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) आंदोलन ठिकाणी संपा (Strike) मधील दिलीप पांचाळ यांना शासन आंदोलनावर तोडगा काढत नाहीत यामुळे मानसिक – आर्थिक ताणाने सौम्य हृदयाचा झटका आल्याने त्यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेवून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई (Ambajogai) येथे हलवण्यात आले. या गोष्टी गोष्टीमुळे कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करून राग व्यक्त केला.
(ST worker suffers heart attack at Dharuraat agitation site; Moved to Ambajogai.)
धारूर (Dharur) आगारासमोर एसटी कर्मचारी (ST worker) उपोषण करत बसले होते त्या ठिकाणी श्री दिलीप मधुकर पांचाळ वाहक यांना सौम्य हृदयाचा झटका (heart attack) आल्याने त्याठिकाणी ते कोसळले. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धारूर येथे दाखल केले.
परंतू त्या ठिकाणी स्थानिक डाॅक्टरांनी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (SRTR) शासकीय रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. हा प्रकार मानसिक ताणातून झालेला असल्याचे बोलले जात आहे. तर संपातील कर्मचारी यांनी सरकार रोष व्यक्त केला आहे. सरकारने संपावर तोडगा काढावा नाहीतर असे प्रकार वाढत जाणार आहेत.
दोन महिन्यापासून संप चालू आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण वाढला आहे. कर्मचाऱ्यांना सध्या आर्थिक टंचाई मोठ्या प्रमाणात संसारामध्ये जाणवत आहे. या मानसिक ताणतणाव मध्ये काहीही प्रकार घडू शकतो.
तरी प्रशासनाने या आंदोलनावर तोडगा काढून कर्मचाऱ्याला होत असलेला मानसिक आर्थिक ताण कमी करावा नसता येणारे दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांचे काय होईल हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया संपातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.