शेती विषयक

जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान; अतिवृष्टीत अशी घ्या पिकांची काळजी…

किल्लेधारूर दि.6 सप्टेंबर – सध्या बीड (Beed) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने पुनर्आगमन केले असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी (heavy rain) झाली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत कृषि विभागाच्या (Department of Agriculture) वतीने मार्गदर्शन करण्यात आले आहे.

(Major damage to agriculture and crops in the district; Take care of crops like this in heavy rains …)

जिल्ह्यात मागिल दोन दिवसात पावसाचा हाहाकार दिसुन येत आहे. शनिवारी व रविवारी रात्री तुफान पाऊस झाला. या अतिवृष्टिमुळे शेतात पाणी साचून राहील्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होवू शकतो. तो रोखण्यासाठी ताबडतोब पाण्याचा निचरा करावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी शरद शिनगारे यांनी केले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या पिकांसाठी खालील सुचनांचे (guidelines) पालन करावे असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

1.सोयाबीन – पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे पाने पिवळी पडणे, शेंगवर कले खोलगट चट्टे पडणे असे बुरशीजन्य करापा रोगाची लक्षणे दिसून आल्यास खालीलपैकी एका बुरशनाशकाची प्रति 10 ली. पाणी या प्रमाणात मत्रा घेऊन फवारणी करावी
टेब्यूकोनाझोल 12.5 मिली किंवा
टेब्यूकोनाझोल + सल्फर 25 ग्रॅम किंवा
हेक्झाकोनाझोल 5% ईसी 10 मिली

2.तूर – पिकात मरीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मर ग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी तसेच चोहबजूनी एक मीटर अंतरावर बाविस्तिन 25 ग्रॅम प्रति 10 ली. पाणी या प्रमाणात आळवणी करावी
3.कापूस – या पिकात आकस्मित मर अथवा मूळकूज दिसू लागल्यास कॉपर ऑक्सीकलोराइड 25 ग्रॅम + युरिया 200 ग्रॅम + पंधरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 ली. पाणी या प्रमाणात घेऊन झाडांच्या मुळाना द्यावे.

4.कांदा– पिकात पाऊस जास्त झाल्यास शेतात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी ताबडतोब जास्तीच पाणी निचरा करून द्यावा जास्त पावसामुळे कांद्याच्या पाती पिवळी पडली असल्यास ( नत्राच्या कमतरतेमुळे) 100 ग्राम युरिया प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!