मंगळवारी दोन बळी… बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजची संख्या.. पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.29 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2262 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 32 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2230 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाधितांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान कोरोनावर (corona) उपचार घेत असलेल्या दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-11, अंबाजोगाई-1, आष्टी-8, धारुर-0, गेवराई-2, केज-2, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-5, शिरुर-2, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बळींची शृंखला सुरुच असून पाच दिवसात 12 बळींची नोंद झाली आहे. काल मंगळवारी यात दोघांची वाढ झाली आहे. कालच्या मृत्यूत एक जुने तर एक नवीन अपडेट असल्याचे आरोग्य विभागाने माहिती दिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2766 जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी 2 हजार 844 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली तर, 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3 हजार 029 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65 लाख 44 हजार 606 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 65 हजार 277 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.26 टक्के एवढे झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!