पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कारवाईचा मार्ग मोकळा….

पुणे दि.२६- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) यापुर्वी केवळ आकस्मात नोंद पोलिस ठाण्यात होती. पुजाच्या कुटूंबियांनीही काहीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे पोलिसांना मर्यादा येत होत्या. कुणीही तक्रार दाखल करण्यास पुढं येत नसल्यामुळे या प्रकरणी कारवाई केली जात नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं होतं. पुणे पोलिसांच्या (Pune Police) या भूमिकेवर भाजपसह राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. अखेर आता या प्रकरणात पोलिसांनी हवी होती ती गोष्ट घडली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या सून स्वरदा बापट यांनी ही तक्रार दिली आहे.

(Pooja Chavan commits suicide)

पुणे येथील वानवडी मधील एका सोसायटीत पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला महाविकास आघाडी सरकार मधील वन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. याप्रकरणी काही ऑडिओ क्लिप्स तसेच फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. परंतू पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan suicide case) प्रकरणात आजपर्यंत कोणत्याही व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद किंवा कारवाई झालेली नाही. त्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल ज्या वानवडी परिसरात ही घटना घडली त्या घटनास्थळी भेट देऊन नंतर पोलीस ठाणे गाठले. मात्र याठिकाणी गुन्हा दाखल करुन घेण्याच्या मुद्द्यावरुन त्यांची व पोलिस निरिक्षक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. पोलिसांनी सुमोटो वापरुन स्वतः गुन्हा दाखल करावा अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र मुलीचे आई-वडील किंवा इतर कुणीही तक्रार केली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.

दरम्यान, पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची सून स्वरदा यांनी अखेर या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. त्यांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Pune Police) तक्रार दाखल केली आहे. या तक्रार अर्जात थेट वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांचं जी तक्रार हवी होती ती मिळाली असून पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!