कोरोनाची तिसरी लाट सुरू; वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा.

हैदराबाद दि.13 जुलै – गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona) सुरू होती. दुसरी लाट ओसरत नाही, तर वैज्ञानिकांकडून तिसरीही लाट (Third wave of corona) येणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. अशातच पुन्हा देशातील कोरोना बाधितांची (Corona positive) संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर वैज्ञानिकांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
(Corona’s third wave begins; The shocking claim of scientists.)
हैदराबाद विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि एका वरिष्ठ भौतिकशास्त्रज्ञाने भितीदायक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, भारतात 4 जुलैपासूनच कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) सुरू झाली असण्याची शक्यता आहे. डॉ. विपिन श्रीवास्तव यांनी 24 तासांच्या काळात संसर्गामुळे (Infection) झालेले मृत्यू आणि त्या काळात उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या यातले प्रमाण याचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला आणि त्याला डीडीएल (DDL) असे नाव दिले आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आम्ही डीडीएलमध्ये (DDL) चढउतार पाहिले होते. परंतू, त्यावेळी संसर्गामुळे (Infection) मृत्यूंची आकडेवारी 100 च्या संख्येत होती. आणि त्यामुळे आपण हे संकट संपत आल्याच्या भ्रमात होतो. मात्र नंतर स्थिती भयंकर झाली. तशीच परिस्थिती 4 जुलैपासून दिसून येत असल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.
तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे (Second wave of corona) भयंकर स्वरूप पाहता जनता आणि शासनाला अधिक सावधान राहावं लागणार आहे. खूप जास्त नकारात्मक असलेले डीडीएलही चांगले नसते, कारण याचा अर्थ असा होतो की, 24 तासांत बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत या काळात नव्या रुग्णांची संख्या जास्त वेगाने वाढत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.