बीड जिल्ह्यात आजवरची सर्वाधिक संख्या 764; धारुर 29, केज 71; वीकेंड लॉकडाऊनला लोकांचा प्रतिसाद

बीड दि.10 एप्रिल- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. काल बीड (Beed) जिल्ह्यातील 6140 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 764 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5376 जण निगेटिव्ह आली आहेत.
आज चौतिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 141 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात बीडनंतर अंबाजोगाईत 143 व आष्टी तालुक्यात 123 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 29 केजमध्ये 71 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज वीकेंड लॉकडाऊनला (lockdown) उत्तम प्रतिसाद मिळाला.
(Beed district has the highest number of 764 to date; Dharur 29, Kaij 71; People’s response to Weekend Lockdown)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-141, अंबाजोगाई-143, आष्टी-123, धारुर-29, गेवराई-60, केज-71, माजलगाव-73, परळी-59, पाटोदा-25, शिरुर-26, वडवणी-14
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा राज्यासह बीड जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.10 शनिवारी दुपारी आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली आहे. मंगळवारी 716, बुधवारी 580 गुरुवारी 711, शुक्रवारी 732 तर आज शनिवारी 764 कोरोना बाधित आढळून आली आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांपासून केंद्रीय आरोग्य पथक तळ ठोकून आहे. आजपासून जिल्ह्यातील अनेक शहरात कंटेनमेंट झोन करण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात शुक्रवारीही रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम राहिला. दिवसभरात 58 हजार 993 नवीन करोनाबाधित आढळून आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे दिवसभरात 301 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर 1.74 टक्के इतका असून, आतापर्यंत राज्यात 57 हजार 329 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण 5 लाख 34 हजार 603 रूग्ण उपचार घेत आहेत.