शैक्षणिक

ज्युनियर आयएएस स्पर्धेत एकाच शाळेचे सहा विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी.

50 / 100

किल्ले धारूर दि. 8 – ज्युनियर आयएएस स्पर्धेत एकाच शाळेचे सहा विद्यार्थी किल्ले धारूर ( Dharur ) तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमीच आघाडीवर असलेल्या ज्ञानदीप विद्यालयाचे 6 विद्यार्थ्यांनी ज्युनिअर आय. ए. एस. स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये नेत्रदीपक असे यश संपादन केले आहे. तर याच परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.

बाल वयापासून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे धारूर ( Dharur ) तालुक्यातील एकमेव विद्यालय म्हणून ओळख आहे. सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षामध्ये संस्कार प्रकाशन लातूर ( Latur ) आयोजित ज्युनिअर आय.ए.एस. ( Junior IAS ) या स्पर्धा परीक्षेची आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात आले होते. या मध्ये ज्ञानदीप विद्यालयाच्या खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
इयत्ता दुसरी-
राज्यात 8 वी : कु. इशिता सुधीर शिनगारे
राज्यात 15 वा : चि. आरुष अशोक नागिशे
इयत्ता तिसरी-
राज्यात 4 थी : कु. अक्षया महादेव कणसे
राज्यात 7 वा : चि. साईनाथ अमोल गुळवे
इयत्ता 4 थी-
राज्यात 5 वा : चि. आदिराज बालाजी चव्हाण
राज्यात 7 वी : कु. अदिती संभाजी तिबोले

तसेच तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी वर्ग 2 रा सुयश शहाजी राऊत, अक्षरा वैजनाथ साखरे, ओजल तुकाराम मुंडे वर्ग 3 रा समीक्षा रमेश चाटे, समर्थ राहुल हेडगिरे, श्रावणी राम करपे वर्ग 4 था यशश्री प्रवीण धोतरे, आरोही बालासाहेब धोतरे, लावण्या बजरंग पवार, श्रावणी अशोक तट वर्ग 6 वा रिद्धी रमेश चाटे, यशराज भक्तराज तोंडे, सार्थक शाहजी राऊत वर्ग 7 वा वेदांत हरिराम नाईकवाडे सार्थक विनायक शिनगारे, प्रणव प्रमोद शिनगारे. या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकवर्ग यांच्यातून सर्वत्र कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
( State level merit list of six students from same school in Junior IAS competition. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!