
मुंबई दि.1 एप्रिल – महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात कडक निर्बंध लादण्यात आलेली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून लाॅकडाऊनचे संकेत दिले होते, पण आता त्यांनी महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
(Health Minister Rajesh Tope’s big statement regarding lockdown in Maharashtra;)
महाराष्ट्रात (Maharashtra) लाॅकडाऊन संदर्भात अजुन कोणताही निर्णय घेण्यात आला नसुन चर्चा ही त्याच दिशेने सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच लाॅकडाऊन हा अंतिम पर्याय ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता लाॅकडाऊन (lockdown) होणार अशा बातम्या माध्यमात प्रसारित झाल्या.
महाराष्ट्रातील जनतेनं जर नियमांचं पालन केलं आणि सोशल डिस्ट्न्सिंगचं योग्यरित्या पालन केलं तर कोरोनाचा संसर्ग वाढणारच नाही आणि परिणामी महाराष्ट्रात लाॅकडाऊन (lockdown) लावण्याची वेळ येणार नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले की, 50 टक्के लाॅकडाऊनचाही कोणता निर्णय अजुन घेतला गेलेला नाही.
महाराष्ट्रात (Maharashtra) सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना रोखण्यासाठी कडक आणि कठोर निर्बंंध लावणं अत्यंत गरजेचं असून त्या दृष्टीने सरकार येत्या 2 दिवसात नवी नियमावली जाहीर करेल असं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं. शिवाय अंतिमत: जिव वाचवण्यासाठी कडक लाॅकडाऊन हाच एक पर्याय सरकारकडे आहे आणि त्याचा आराखडा ही शेवटचा पर्याय म्हणुन बनवुन ठेवला जात आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.



