माझं गाव

धारूर आगारातील बसमध्ये प्रवाशावर आला जीवघेणा प्रसंग.

49 / 100

किल्लेधारूर दि.2 सप्टेंबर – धारूर आगारातील बसमध्ये प्रवाशावर जीवघेणा प्रसंग ओढावला. औरंगाबादहून धारूरकडे (Aurangabad – Dharur) येत असलेल्या बसमध्ये एका प्रवाशाला हृदयविकाराचा धक्का (heart attack) आला. गाडीचे चालक व वाहकाने तत्परता दाखवत प्रवाशाला तात्काळ बीड (Beed) जिल्हा रुग्नालयात दाखल केल्याने या प्रवाशाचे प्राण वाचले. बस (ST Bus) कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
( A fatal incident happened to a passenger in a bus in Dharur depot. )

दि.31 अॉगस्ट बुधवार रोजी धारूर आगाराची बस क्रमांक एम. एच. 06 एच 8480 ही औरंगाबादहून धारुरकडे येत होती. दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास बस बीडहून धारूरकडे धावत असताना बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक प्रवासी मोहन मिलिंद मस्के रा.वैद्यकिन्ही (वय 65 वर्षे) यांना छातीत वेदना होऊन हृदयविकाराचा धक्का आला. चालक व वाहक यांनी बस त्वरित जिल्हा रुग्णालयात बीड येथे नेऊन सदर प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले.

चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सदर प्रवाशाला वेळेत तात्काळ उपचार मिळाले. यामुळे प्रवाशावर आलेल्या जीवघेण्याप्रसंगातून जीवदान मिळाले. बसचे चालक अ. बा. गाडगे (चा.क्र. 732) व वाहक श्रीमती सं. दि. कांबळे (वा. क्र. 779) यांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतूक होत आहे. याबाबत आगार व्यवस्थापक (Depo Manager) शंकर स्वामी यांनी चालक व वाहकाच्या कामगिरीचे कौतूक करत त्यांचा आगारात सत्कार करणार असल्याचे सांगितले. धारुर आगारातील कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मेहनत घेवून नुकताच जिल्ह्यात उचांकी उत्पन्न घेत आगाराचा नावलौकिक मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!