बालिकेवरील अत्याचार प्रकरणी नराधमास जन्मठेपेची शिक्षा; बीड जिल्ह्यातील न्यायालयाचा आठ महिन्यात निकाल.

माजलगाव दि.18 फेब्रुवारी – एका 9 वर्षीय बालीकेवर अत्याचार करणार्या नराधमाला माजलगाव जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालाकडे माजलगाव तालुक्याचं लक्ष लागून होतं. अत्याचाराची दुर्दैवी घटनेचा बीड ( Beed ) जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. अवघ्या आठ महिन्यात जलदगतीने न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
पुरुषोत्तम श्रीराम घाटूळ या नराधमाने सुर्डी येथील 9 वर्षीय बालीकेवर 13-7-2021 रोजी अत्याचार केला होता. सदरील प्रकार पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ( Police ) ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा ( Crime ) दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरण माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होते. न्यायाधिश संतोष देशमुख यांनी आरोपीला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड.मिलिंद वाघीरकर यांनी यूक्तीवाद केला. त्यांना अॅड.रंजीत वाघमारे, अॅड. श्रीमती कांडोरे, अॅड.पठाण यांनी सहकार्य केले.
काय आहे घटना…
आठ महिन्यापुर्वी माजलगाव तालुक्यातील एका गावात दि. 13 जून 2021 रोजी पीडित मुलीवर आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. घटनेची नोंद माजलगाव पोलिसांत होताच अवघ्या 3 तासात पोलिसांनी आरोपीला अटक करत ताब्यात घेतले होते.
मात्र तपास अधिकार अतिरिक्त पोलीस निरीक्षक नीता गायकवाड यांनी आरोपीला न्यायालयात हजर करून एवढ्या मोठ्या व संगीन गुन्ह्यात पोलीस कोठडी ( Police custody ) न मागता न्यायालयीन कोठडी ( Judicial custody ) मागितली. यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयात याप्रकरणी निषेध नोंदवून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते.
प्रकरणाचे गांभिर्य पाहून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर सदर तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (DySp) सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक ( API ) नीता गायकवाड यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते.
( Rapist sentenced to life imprisonment for child abuse; Important decision of Majalgaon court. )