आईचातांडा येथील जगंदबा देवीची याञा व अंबाचोंडी माता नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा

किल्धालेरुर दि.२५ (वार्ताहर ) तालूक्यातील आईचातांडा येथील जगदंबा देवीचि याञा हि नवमी चे दिवशी होते हजारो भावीक भक्त गर्दी करतात या वर्षी कोरोना मुळे हि याञा रद्द करुन रितीरीवाजा प्रमाणे आज दसऱ्या दिवशी पहाटे विधीवत पुजा करण्यात आली. शहराजवळ असलेल्या अंबाचोंडी माता मंदिरातही नवरात्रोत्सवाची आज पहाटे हवन होवून सांगता झाली. यावेळी भाविक भक्तांनी कोरोनाचे नियम पाळून देवीचे दर्शन घेतले.
तालूक्यातील पिंपरवाडा तहत येणाऱ्या आईचातांडा येथील जगदंबा देवीची याञा मोहत्सव प्रतिवर्षी नवमी व दशमीला साजरी होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भावीक भक्त येथे दर्शनासाठी रांगा लावतात. याकाळात येथे तिन ते चार हजार बकऱ्यांचा बळी देवीला देऊन नवस पुर्ण केला जातो. येथील भक्तांमध्ये लमान व वंजारी समाजाचा वर्ग मोठा आहे. आज दसऱ्या दिवशी कुस्त्याचा फड येथे रंगतो. यंदा कोरोना प्रादुर्भाव असल्याने यात्रा उत्सव रद्द करुन शनिवार, रविवार आणि सोमवारी केवळ औपचारिक विधिवत पुजन करुन अत्यंत साध्या पध्दतीने उत्सव साजरा करण्यात आला आहे. आज दसऱ्या दिवशी ठराविक अंतराचे पालन करत भाविक दर्शन घेत असल्याचे निदर्शनास आले. शहराजवळ डोंगरात वसलेल्या श्रीक्षेत्र अंबाचोंडी माता मंदिरातही नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा झाला. मंदिरावर आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. आज दसऱ्या दिवशी पहाटे होम हवन करुन नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. पहाटे पासुन भाविक कोविड नियम पाळून बाहेरुन मातेचे दर्शन घेत असल्याचे दिसुन आले.