धक्कादायक… लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही डॉक्टरसह तिघे कोरोना बाधित; बीडमधील घटना

बीड दि.15 मार्च – काही दिवसांपुर्वी बीड (Beed) जिल्ह्यातील आरोग्य विभागातील वरीष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आल्याचे वृत झळकले होते. त्यापाठोपाठ आता कोरोना लसीचे (Corona vaccine) दोन्ही डोस घेतल्यानंतरही एका डॉक्टरसह परिचारीका, आरोग्य कर्मचारी असे तिघे जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे खळबळ माजली असून लस घेतल्यावरही कोविड नियम पाळणे गरजेचे असल्याचे दिसुन येत आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास काही दिवसांचा अवधी लागत असल्याने यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे.

(Shocking … Three corona infected with doctor even after taking second dose of vaccine; Incidents in Beed)

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली. पहिल्या काही दिवसांत जिल्हा राज्यात अव्वल राहिला. पहिल्या टप्यात आरोग्यकर्मी, दुसऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नियोजन झाले. सध्या जिल्ह्यात 45 ते 60 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु आहे. लसीकरणाची मोहिम सुरु असताना अनेक ठिकाणाहून लसीकरणानंतरही कोरोना बाधा होत असल्याच्या घटना घडत आहेत. बीड जिल्ह्यातही अशी घटना घडली असून एका डॉक्टरसह दोन आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत.

यावरून लस घेतली तरी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, हे स्पष्ट होते. लस घेतल्यावर कोरोना होत नाही, हा मनातील गैरसमज काढून काळजी घेणे आवश्यक आहे. लस घेतल्यावर कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा सर्वांच्या मनात गैरसमज होता. लस घेतल्यावरही काळजी घ्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात आले, परंतु अनेकांनी काळजी घेतली नाही. यामुळे वारंवार असे प्रकार उघडकीस येत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने इतरांना लस घेण्याचे आवाहन करण्यासह स्वता: पुढे होऊन लस घेतली. पहिला डोस पहिल्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारी आणि दुसरा डोस १६ फेब्रुवारीला घेतला. परंतु रविवारी थोडा ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या डॉक्टरसह जिल्हा रूग्णालयातील परिचारीका आणि एक आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना लस (Corona vaccine) घेतली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही बाधित आलेल्या डॉक्टरने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!