केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चक्क अंतरपाट धरला ; वऱ्हाडी मंडळी अवाक.

नांदेड दि.3 जुलै – केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चक्क अंतरपाट धरल्याचे एका कार्यकर्त्यांच्या लग्नात दिसून आले. यामुळे या विवाह समारंभात उपस्थित असलेले सर्वच वऱ्हाडी मंडळी अवाक झाली होती. सतत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असणारे दाजी यंदा आंतरपाटामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील नळणी येथील गजानन वराडे यांची मुलगी आकांशा व चोरहाळा येथील जगन्नाथ पचारने यांचे चिरंजीव उमेश यांचा विविह भोकरदन शहरातील एका मंगल कार्यालयात आज दि.3 रोजी दुपारी 12.45 वाजता होता. या विवाहासाठी दोन्ही कडील वर, वधु पित्यानी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विवाहाचे निमंत्रण दिलेले होते.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे गेल्या दोन दिवसांपासून भोकरदन तालुक्यातच असल्यामुळे ते आजच्या (दि. 3 जुलै) या विवाह समारंभाला उपस्थिती दर्शवली. विवाहाची वेळ होऊन गेली तरीही विवाह लावला जात नव्हता. याप्रसंगी वधू व वराकडील मंडळींनी दानवे यांना व्यासपीठावर बोलावून सत्कार केला. या सत्कारानंतर पुरोहितांनी आंतरपाट पकडण्यासाठी पुकारा केला.
मात्र आंतरपाट धरण्यासाठी कोणी लवकर येत नव्हते. त्यामुळे वधू वरांसोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा बडेजाव न करता चक्क आंतरपाट पकडला. येवढंच नाही तर पुरोहितांना लवकर विवाह लावण्याच्या सूचना केल्या. यामुळे विवाहास उपस्थित दोन्ही कडील वऱ्हाडी अवाक झाले व सर्वांनी दानवे यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
( Union Minister of State for Railways Raosaheb Danve had a good time; The congregation present was amazed. )