आज अंबाजोगाई तालुका साडेतीनशेजवळ; तर जिल्ह्याची संख्या बाराशेपार. चार तालुक्यात शंभरावर रुग्ण.

बीड दि.17 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 4261 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1211 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3051 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today, Ambajogai taluka is near three and a half hundred; The number of districts is twelve. Hundreds of patients in four talukas.)
आज एकेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात तब्बल 143 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 337, आष्टी तालुक्यात 119 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 47 तर केजमध्ये 112 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-143, अंबाजोगाई-337, आष्टी-119, धारुर-47, गेवराई-39, केज-112, माजलगाव-65, परळी-138, पाटोदा-99, शिरुर-53, वडवणी-59 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढत असल्याने आता कोविड काळजी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही स्वरुपाच्या माहितीसाठी आता 24 तास कर्मचारी नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठल्याही कोविड सेंटरमधील उपलब्ध खाटा व रुग्णालयाबाबतची माहिती तसेच प्रशासनाला काही सुचना अवगत करावयाच्या असल्यास 02442- 222604 या क्रमांकावर तर औषध उपलब्धते बाबतच्या अनुशंगाने किंवा रेमडीसीवीर इंजेक्शन च्या उपलब्धतेच्या अनुशंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या 8446165371 या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.
जिल्ह्यात आता कोविड सेंटर फुल होत असुन इतर समस्या पुढे येत आहेत. बुधवारी रात्री 8 पासून राज्यात कलम 144 लागू करत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील पंधरा दिवस यामुळे सर्वांना घरातच रहावं लागणार आहे. आज दुसऱ्या दिवशीही दुकाने कडकडीत बंद असताना सडक सख्याहरी रस्त्यावर भटकत असल्याचे दिसून येत आहे. तर पोलिस प्रशासनाला आता कठोर भुमिका घेण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांनी मात्र कडकडीत बंद ठेवत चांगला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, शुक्रवारी चोवीस तासांमध्ये राज्यात 63,729 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 398 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे कोरोनाच्या प्रसारापासूनचे सर्वाधिक आकडे आहेत. शुक्रवारी समोर आलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येनंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 37,03,584 वर पोहोचली आहे. तर, मृत्यूचा आकडा 59,551 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 30,04,391 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 6,38,034 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.