बीड कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय रुग्ण संख्या ….

बीड दि.13 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1074 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 4 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1070 जण निगेटिव्ह आहेत. आज तीन तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-1, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-2, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत काल व आज मोठी घट दिसून आली. आज तीन तालुक्यात 4 रुग्ण आढळले आहेत. रविवारी (दि.12) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 5 होती. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2835 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 76 झाली आहे.

दरम्यान, राज्यात रविवारी दिवसभरात 704 जणांना कोरोनाचं निदान झालं. राज्यात रविवारी दिवसभरात कोरोनातून बऱ्या झालेल्या 699 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 64,92,504 वर पोहोचली आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 97.72 इतका असून, आज दिवसभरात 704 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

दिवसभरात कोरोनामुळे 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, कोरोना मृत्यूदर सध्या 2.12 टक्के इतका आहे. आतापर्यंत राज्यात 6,68,75,975 इतके नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यापैकी 66,43,883 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या राज्यात 75,313 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये असून, 855 रुग्ण संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!