राष्ट्रीय

National Shooting Competition धारुरची जागृती राष्ट्रीय नेमबाजीसाठी पात्र.

51 / 100

किल्लेधारुर दि.26 अॉगस्ट – National Shooting Competition 10 व्या पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेत धारूरची Dharur नेमबाज जागृती तिवारी हिने राष्ट्रीय पात्रता फेरीत यशस्वी कामगिरी केली असून 349 गुण मिळवत तिने मैदान मारले आहे.

दिनांक 18 ते 29 ऑगस्ट दरम्यान अहमदाबाद , गुजरात येथे 10 व्या पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेत Shooting Competition धारूरची Dharur उद्योनमुख पिस्तूल नेमबाज जागृती अमरजीत तिवारी हिने यश संपादन केले. एअर पिस्तूल सब युथ गटात महाराष्ट्राकडून तिने पाच पात्रता फेरीत नेत्रदिपक कामगिरी केली. प्रत्येक फेरीत पात्र गुणांपेक्षा अधिक गुण मिळवून तिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा , दादरा नगर हवेली, दिव व दमण या राज्यामधून सुमारे 1800 रायफल व पिस्तूल नेमबाज सहभागी झाले आहेत. जागृतीने या राज्य स्तरीय नेमबाजी स्पर्धेत National Shooting Competition कमी कालावधीत चांगली कामगिरी करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तीने धारूर Dharur वरून औरंगाबादला Aurangabad येऊन अजिंठा नेमबाजी केंद्रात प्रशिक्षक संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 2 ते 3 तास सराव करत अथक परिश्रम केले. तिचे औरंगाबाद Aurangabad जिल्हा रायफल संघटनेचे अध्यक्ष व पोलीस आयुक्त मनोज लोहिया, संघटनेचे पदाधिकारी अनंत बर्वे, मनीष धूत, उमेश पटवर्धन, हेमंत मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!