उद्योग व व्यापार

उद्योग विश्व… नर्मदा अॉईलची बाजारात धूम; माधव निर्मळ यांची अॉईल इंडस्ट्रीजमध्येही छाप…

किल्लेधारूर दि.23 अॉक्टोंबर – येथील राजकीय क्षेत्रासह उद्योग विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या माधवराव निर्मळ यांच्या नवीन नर्मदा रिफाईन्ड अॉईल इंडस्ट्रीजमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. अतिशय मागासलेल्या धारुर सारख्या भागात निर्मळ बंधूंनी उभारलेल्या उद्योगांमुळे शेकडो लोकांना रोजगाराचे दार उघडली आहेत. अवघ्या काही दिवसात नर्मदा अॉईलला (Narmada Refined Oil) लोकांनी पसंती दिली असून सध्या नर्मदा अॉईलची बाजारात धूम आहे.

(Industry World … Narmada Oil in the market; Madhav Nirmal’s impression in oil industries too …)

धारुर (Dharur) शहरात नव्याने नर्मदा रिफाईन्ड अॉईल इंडस्ट्रीजचा (Industries) नुकताच शुभारंभ झाला आहे. या नवीन उद्योगामुळे शहराचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. माधवराव निर्मळ (Madhav Nirmal) यांच्या दुरदृष्टीतून या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून अतिशय मागास असलेल्या धारुर तालुक्यातही उद्योग उभारुन यश संपादन करता येते हेच त्यांनी दाखवून दिले आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या उद्योगाच्या माध्यमातून महाराष्ट्रात शुध्द व आरोग्यदायी खाद्यतेलाचा पुरवठा होणार आहे. ज्यात सुर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा, राईस ब्रेन, सरकी, मस्टर्ड, पाम, आदी खाद्यतेलाचा समावेश आहे.

‘शुध्दता और स्वाद…! हर बुंद के साथ…!!’ हे ब्रीद घेवून नुकताच प्रतिदिन 5 लक्ष लिटर उत्पादन क्षमता असलेल्या या उद्योगातील पहिल्या बंद पाकिटाची निर्मिती केली. उद्योजक माधवराव निर्मळ यांनी पहिले पाकिट येथील प्रसिध्द तिर्थक्षेत्र व ग्रामदेवता श्रीअंबाचोंडी मातेच्या चरणी अर्पण केले आहे. निर्मळ यांनी पारंपारिक सराफा व्यवसायासह पंधरा वर्षापूर्वी शहरात जिनिंग व्यवसायाच्या माध्यमातून कॉटन उद्योग क्षेत्रात प्रवेश केला. वेगवेगळ्या ठिकाणी कॉटन उद्योगाच्या शाखा उभारून शेतकर्‍याच्या मालाला नेहमीच चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वाभाविकच त्यांनी कॉटन उद्योगात (Cotton industry) दबदबा निर्माण केला.

याशिवाय निर्मळ बंधूनी धारुर शहर व परिसरात नर्मदा फायबर्स, नर्मदा ॲग्रो कोटेक्स, नर्मदादेवी कॉटस्पीन, मिनाक्षी ट्रेडींग कंपनी, मेघना अॉईल इंडस्ट्री, नर्मदा पेट्रोलियम, विजय सर्विसेस इस्सार पेट्रोल पंप, आदित्य पेट्रोलियम, विजय पेट्रोलियम, नर्मदा फिलिंग स्टेशन, आदित्य स्टोन क्रशर ॲन्ड कन्स्ट्रक्शन, निर्मळ ज्वेलर्स, निर्मळ ज्वेलर्स माजलगाव, अंबादास सिल्वर शॉप, विजय हॉटेल, प्रतिक्षा हॉटेल, हॉटेल मधुबन, नर्मदा सोलार इनर्जी प्रा.लि. अथर्व ट्रेडींग कंपनी अशा अनेक उद्योग व व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार मिळाला. आता नर्मदा खाद्यतेलाच्या नव्या उद्योगाच्या माध्यमातून निर्मळ यांचे एक पाऊल प्रगतीचे पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी अगदी साध्या पध्दतीने मातोश्रींच्या हस्ते शुभारंभ केलेल्या या उद्योगाला लोकांची पसंती मिळत आहे. सध्या सणासुदीचा काळ असताना खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. यातच नर्मदा अॉईलने धाडस करत किफायतशीर दरात शुध्द आणि पौष्टिक खाद्यतेल बाजारात आणले. दोनच आठवड्यात मराठवाड्यातील बीड (Beed), औरंगाबाद, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, जालना, नांदेडसह शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात नर्मदा अॉईलची मागणी वाढली आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात चांगल्या प्रतीचे खाद्यतेल मिळत असून ‘शुध्दता और स्वाद…! हर बुंद के साथ…!!’ या ब्रीदाला साजेसा प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!