बीड कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी .

बीड दि.14 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 644 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 6 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 638 जण निगेटिव्ह आली आहेत. आज केवळ तीन तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-2, अंबाजोगाई-0, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-1, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आटोक्यात आली आहे. काल शनिवारी 6 व आज रविवारी 6 बाधितांची नोंद आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार शनिवारी 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2816 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 59 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी 999 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1,020 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 12 हजार 219 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची संख्या 66 लाख 23 हजार 344 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 66 हजार 913 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.64 टक्के झाला आहे.