धारुर शहरात चोरट्यांचा धुमाकुळ…भरवस्तीत घर फोडले.

किल्लेधारूर दि.9 जुलै – धारुर (Dharur) शहरातील गायकवाड गल्लीत घरमालक गावाला गेल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी (thieves) घरातील कपाट फोडून चांदीच्या वस्तु व नगदी रोकड असा अंदाजे 25 हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी लक्षात आली. पोलीस (Police) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
(A swarm of thieves in Dharur city … broke into a house.)
धारुर (Dharur) शहरात भरवस्तीत असलेल्या गायकवाड गल्लीत अन्नलदास कुटूंबिय बाहेरगावी लग्नास गेले आहेत. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत गुरूवारी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात शिरून कपाट उघडले. कपाटातील चांदीचे दागीने व नगदी रक्कम व इतर सामान लंपास केले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले.
सदरील प्रकार सकाळी शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्या वर माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड यांनी पोलिसांना कल्पना दिली. सहायक पोलीस निरीक्षक कानीफनाथ पालवे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांनी (Police) परिस्थितीची पाहणी केली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहीती नुसार 25 हजारा पेक्षा जास्त रकमेचे साहित्य चोरीस गेल्याचा अंदाज असून बाहेर गावी गेलेले घरमालक परत आल्यास या प्रकरणी तक्रार नोंदवली जाईल. हि घटना भरवस्तीत घडल्याने नागरीकात मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.