कोरोंना विशेष

बीड जिल्हा प्रशासनाने काढले नवीन आदेश…. मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेसवर करडी नजर

बीडः दि.१७ – बीड जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज नवीन आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यातील सर्व शहरातील मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेसमध्ये कोविड (Covid) विषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे व नियम मोडून काढणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल राज्यभरात नव्या कोरोना (Coeona) लाटेबाबत सतर्कता बाळगण्याच्या सुचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने विशेषतः गर्दीच्या ठिकाणावर लक्ष केंद्रित केले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर हळूहळू जनजीवन पुर्वपदावर आले असून नियमांची पायमल्ली करुन सर्रास गर्दीत समारंभ होत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यात अचानक वाढलेली कोरोना (Corona) रुग्ण संख्या व नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका पाहता शासनाने नियम काटेकोरपणे पालन करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत असून गर्दीत सर्व कोरोना नियम मोडल्या जात आहेत. कोचिंग क्लासेसमध्येही सामाजिक अंतर व इतर कोविड (Covid) नियम पाळली जात नसल्याने कोरोना रुग्ण वाढीचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने आज नवीन आदेश काढत लग्न समारंभ होणाऱ्या मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेसला ५० व्यक्तींची क्षमता, मास्क व सॕनिटायझर वापर, दोन व्यक्तीत ६ फुटांचे सामाजिक अंतर इत्यादी कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश काढले आहेत. यात कसुर करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे लग्न समारंभ अथवा सार्वजनिक कार्यक्रमासह कोचिंग क्लासेसवर नियमभंग केल्यास पुन्हा एकदा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!