कोविडमुळे निधन झाल्यास 2 लाखाची मदत; केंद्रापाठोपाठ राज्याची मोठी घोषणा.

पणजी दि.30 मे – आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोविडमुळे निधन झाले असल्यास त्या कुटुंबाला भरपाई म्हणून 2 लाख रुपये देण्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी केली आहे. लवकरच याबाबतची अधिसूचना येईल. गोवा (Goa) आज घटक राज्यातील साजरा करीत असून 35 व्या घटकराज्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील (Goa) जनतेला वर्च्युअल पद्धतीने संबोधले.

(2 lakh assistance in case of death due to covid; The big announcement of this state after the center.)

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) म्हणाले की, कोविडने घरातील कमावत्या व्यक्तींचाही बळी घेतला आहे. अशी काही कुटुंबे असतील की, जी आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील आहेत आणि त्यांच्या घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाले असेल. अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

‘मुख्यमंत्री अनाथ आधार योजना’
कोविडने आई-वडिलांचे निधन होऊन अनाथ बनलेल्या मुलांसाठी ‘मुख्यमंत्री अनाथ आधार योजना’ सरकार सुरू करणार असून अनाथ मुलांना दरमहा मानधन दिले जाईल. तसेच अशी जी अनाथ मुले इयत्ता दहावी किंवा त्यापेक्षा वरील वर्गात शिकत आहेत त्यांना मोफत लॅपटॉप दिला जाईल. बालसंगोपन केंद्रांसाठी आतापर्यंत 18 वर्षे वयोगटापर्यंतच आर्थिक सहाय्य दिले जात होते ते आता 21 वर्षे वयोगटातपर्यंत सांभाळ करणाऱ्या संस्थांना दिले जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोविड (Covid-19) महामारीतून जाताना अनेक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागत आहे. सरकारने महामारीबाबत सुरुवातीपासूनच दक्षता घेतलेली आहे. खाजगी इस्पितळांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. आज गोव्यात कोविड पॉझिटिव्हिटीचा दर कमी होत चालला आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. गोवा या महामारीतून सावरणार हे निश्चित असून ‘कोरोनामुक्त गोवा’ हेच आमचे प्राधान्य आहे.’

केंद्र सरकारने केली ही घोषणा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा मृत्यूदर (death rate) जास्त आहे. याकाळात बऱ्याच चिमुकल्यांचे पोषणकर्ते दुरावले आहेत. कुणाच्या वडिलांना तर कुणाच्या आईला कोरोनाने (covid-19) हिरावले आहे. काही मुलांचे तर दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. या अनाथ झालेल्या मुलांसाठी आता केंद्र सरकारने तरतूद केली आहे. या मुलांना पीएम केअर फंडातून मदत मिळणार आहे.

अनाथ मुलांसाठी नवीन योजना-
पंतप्रधान मोदींनी जी मुले कोरोनाकाळात अनाथ झाली आहेत त्यांच्यासाठी ‘PM-CARES for Children’ ही योजना आणली आहे. याद्वारे अनाथ मुलांसाठी तरतूद केली जाणार आहे.

या मुलांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे. ही मदत वयाच्या 18 वर्षांपर्यंत मिळणार आहे. तर वयाच्या 23 वर्षाच्या नंतर 10 लाखांची मदत या फंडातून मिळणार आहे. तसेच या अनाथ मुलांचा आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य विमाही काढला जाणार आहे. ज्याचे हप्ते PM CARES मधून दिले जाणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!