घात-अपघात

Bus accident धारुर शहरात भीषण अपघात ; बसने तीन दुचाकींना चिरडले.

66 / 100

किल्लेधारुर दि.5 जानेवारी – धारुर शहरात चार वाजण्याच्या सुमारास धारुर आगाराच्या बसने Bus accident  तीन दुचाकींना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कसलीही जिवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका मित्राने  नवीन गाडी आणली. सदर गाडी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्याच्या कडेला उभी होती. नवीन गाडी पाहण्यासाठी  त्यांचे मित्र आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून पाहणी करत असताना धारुरकडे येत असलेल्या धारुर आगाराची बस (क्र. एम.एच. 20 बी.एल. 2930) चालकाचे नियंत्रण सुटले. या भीषण अपघातात  उभ्या असलेल्या चार चाकीसह होंडा, बुलेट व एका दुचाकीला बसने चिरडले. सुदैवाने येथे बसलेले पाच मित्र या अपघातात बालंबाल बचावले. या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे कारण अद्याप समजले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!