आ. सोळंके यांच्या वतीने फेस शिल्ड वाटप

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) आ. प्रकाश सोळंके यांच्या वतीने कोरोनाशी दोन हात करत असलेल्या विविध विभागातील कर्मचारी व पत्रकारांना मास्क शिल्ड वाटप करण्यात आले.
जगासह भारतातही कोरोना वायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाय करीत आहे. प्रशासनातील पोलिस, आरोग्य, महसुल, पंचायत, वीज, नगर परिषद आदी विभागातील कर्मचाऱ्यांसह बरीच पत्रकार रस्त्यावर येवून कार्य करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आ. प्रकाश सोळंके
यांनी सॕनिटायझर, मास्क पाठोपाठ मास्क शिल्ड वाटप करुन कर्मचाऱ्यांची व पत्रकारांचे कौतूक केले. येथील तहसील कार्यालयात सोशल डिस्टंटींगचा नियम पाळत कार्यालय प्रमुख व पत्रकार संघाचे अध्यक्ष यांना वाटप करण्यात आले. यावेळी आशोक डक, माधव निर्मळ, सय्यद शाकेर, नितिन शिनगारे, ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, परमेश्वर तिडके यांच्यासह सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख, तहसीलदार वंदना शिडोळकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, पोलिस निरिक्षक सुरेखा धस, डॉ. सचिन शेकडे, डॉ. चेतन आदमाने, पत्रकार महादेव देशमुख, संदीपान तोंडे, सुनिल कावळे उपस्थित होते.