सांस्कृतिक

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुंबई दि.25 मार्च- राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) नेमका कुणाला दिला जाईल, अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना देण्याचे निश्चित करण्यात आले.

(Maharashtra Bhushan Award to Senior Singer Asha Bhosale)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी या निवडीनंतर आशाताईंचे अभिनंदन केले.

आशाजींचा जीवन पट
आशा भोसले (Asha Bhosle) यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली महाराष्ट्र येथे एका मराठा कुटूंबात झाला त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक आणि संगितकार होते, आशाजी 9 वर्षाच्या असतांना त्यांच्या वडीलांचा ह्नदयविकाराने मृत्यु झाला त्यामुळे घरातील सर्व जवाबदारी मोठ्या बहिणीवर म्हणजे लता मंगेशकर आली.

आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असल्याने त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कऱ्हाडे ब्राह्मण आणि आई देवदासी होत्या. आशा भोसले या हिन्दी चित्रपटांच्या सुप्रसिध्द प्लेबॅक गायिका आहेत. त्यांना लोक “आशाजी” या नावाने ओळखतात.

आशाजींनी (Aashaji) आपल्या करियर ची सुरूवात 1943 साली केली होती. त्यांनी आतापर्यंत हजारो गाणी गायली आहेत, त्यांनी स्वतःचे अल्बम देखील तयार केले आहेत.आशा भोसले सुप्रसिध्द मंगेशकर घराण्याच्या सदस्या असुन महान गायिका लता मंगेशकर यांच्या धाकटया भगिनी आहेत.

आशाजींनी (Aashaji) आपले पहिले गाणे ‘माझा बाळ’ या चित्रपटाकरता गायले होते. त्यांचे पहिले हिन्दी गाणे 1948 साली चुनरिया या चित्रपटाकरता ‘सावन आया’ हे होते. त्यांनी आपले पहिले सोलो गाणे “रात की रानी” या चित्रपटातील “आयेगा आयेगा” हे गाणे गायले होते. त्यानंतर आशाजींनी कधीच मागे वळुन पाहिले नाही. त्यांनी अनेक भाषांमध्ये गायन केले आहे शास्त्रीय संगीत, कव्वाली, भजन, गजल, गंभीर गाणे असो वा रोमांटिक सर्व प्रकारची हजारो गाणी गायिली. त्यांच्या नावे 12000 पेक्षा जास्त गाण्यांचा विक्रमही आहे. त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड मधेही समाविष्ट झाले आहे, त्यांनी 20 भारतीय आणि 12 विदेशी भाषांमध्ये गायन केलं आहे.

भारत सरकार ने आशाजींच्या या विक्रमासाठी त्यांना 2000 साली ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार आणि 2008 मधे पद्म विभुषण अवार्ड देउन सन्मानित केले आहे. आशा भोसले यांना एकुण 18 नॉमिनेशनस् पैकी 7 फिल्म फेयर अवार्ड मिळाले आहेत, त्यांनी आपले पहिले अवार्ड 1967 मधे मिळवले होते. याशिवाय आशाजींना अनेक सन्मान मिळालेली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!