Maharana Pratap Jayanti धारुर शहरात महाराणा प्रताप जयंतीचा अद्भुत नजारा ; जिल्हा पोलिस अधिक्षकांची उपस्थिती.

किल्लेधारूर दि.10 मे – Maharana Pratap Jayanti धारुर शहरात महाराणा प्रताप जयंतीचा अद्भुत नजारा मंगळवार दि.9 मे रोजी दिसून आला. जवळजवळ 25 वर्षानंतर शहरात काढण्यात आलेल्या महाराणा प्रताप जयंती उत्सवात बीड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. A wonderful view of Maharana Pratap Jayanti in Dharur city; Presence of District Superintendent of Police.

दि.9 मे मंगळवार रोजी धारूर शहरात महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महाराणा प्रताप चौकात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी वाजत गाजत सजलेल्या रथात महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणूकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, शेषराव फावडे, लक्ष्मण सिरसट, ठाकूर उदयसिंह दिख्खत, तहसीलदार माधव काळे, पोलिस निरिक्षक विजय आटोळे यांची उपस्थिती होती.
जयंतीचे प्रमुख आकर्षण …
धारुर शहरात जवळजवळ साडेतीनशे वर्षांपासून राजपूत व कनौजी ब्राह्यण या हिंदी भाषिक समाजाची मोठी वस्ती आहे. शहराच्या ऐतिहासिक व राजकीय पटलावर या समाजाचे मोठे योगदान आहे. समाजाचे आदर्श तथा विरशिरोमणी महाराणा प्रताप जयंती Maharana Pratap Jayanti प्रतिवर्षी साजरी होते. मात्र प्रथमच शहरात भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणूकीत समाजाची बैठक होवून कसल्याही मादक दृव्याचे सेवन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरवणूकीत महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारुढ पुतळ्याचा समावेश होता. जुन्नर येथील महाराणा ढोलताशा पथक सर्वांचे आकर्षण ठरत होते. मिरवणूकीत संबळ पथक सहभागी होते. मिरवणूकीत शहरातील सर्वपक्षीय व सर्वधर्मिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष आनंदसिंह दिख्खत व सर्व समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणूकीत समाजातील ज्येष्ठांसह तरुणांचा मोठा सहभाग होता.