कोरोंना विशेष

धारुरला १ कोविड योध्दा पॉझिटीव्ह; जिल्ह्याची पुन्हा शतकाकडे वाटचाल

बीडः दि.७ आगस्ट- काल धारुरहून पाठवलेली ६१ अहवाला पैकी शहरातील १ सहवासित व्यक्ती पॉझिटीव्ह आली आहे. जिल्ह्यात आजही कोरोनाचा कहर सुरुच असल्याचे प्राथमिक आकडेवारी वरुन दिसुन येत आहे.

शहरात गेल्या सात दिवसात दररोज पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. आज शहरातील सर्वाधिक ६१ स्वॅबचा अहवाल असल्याने सर्वांच्या नजरा अहवालाकडे होत्या. या अहवाला पैकी केवळ १ जन पॉझिटीव्ह आढळून आले असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज पॉझिटीव्ह आलेले रुग्ण हे कोविड योध्दा आहेत. कालच्या ६१ स्वॅब मध्ये बँक अधिकारी, कर्मचारी व पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासितांचा समावेश होता. ६१ पैकी १ पॉझिटीव्ह तर ६० निगेटिव्ह आली आहेत. आजही जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठी असून शतकाकडे वाटचाल दिसत आहे. आज धारुर शहरातील ४० लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. काही वेळात अधिकृत आकडेवारी जाहीर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!