आज धारुरच्या २२ स्वॅबची प्रतिक्षा; २१ नवीन स्वॅब पाठविणार

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) आज शहर व तालुक्यातील २२ लोकांचे थ्रोट स्वॅब अहवालाची प्रतिक्षा असून नवीन २१ स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई स्वा.रा.ति. प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने यांच्या कडून मिळाली.
बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आज धारुर तालुक्यातील चोंडी येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील हॉटस्पॉट झोन मधून आलेल्या व ज्यास ५ ते १४ दिवस पुर्ण झालेत अशा तालुक्यातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. आज प्राप्त होणाऱ्या २२ स्वॅब पैकी शहरातील ६ व ग्रामीण भागातील १६ लोकांचा समावेश आहे. आज सांयकाळ पर्यंत या नमुन्याचे अहवाल येणार असून आज संध्याकाळी २१ जनांचे स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात येणार आहेत. चोंडी येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या अती जवळच्या संपर्कातील सहा जनांचे स्वॅब आज पाठवण्यात आली आहेत तर उर्वरित १२ सहवासितांचे स्वॅब उद्या घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शेकडे व डॉ.आदमाने यांनी दिली.