धारुर व शिरुरमध्ये संख्या वाढली… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा काय आहे आजची परिस्थिती.

बीड दि.23 जूलै – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज शुक्रवारी 3966 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 183 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3783 जण निगेटिव्ह आली आहेत. आज शिरुरसह धारुर तालुक्यात संख्या वाढल्याचे दिसुन येते. धारुर तालुक्यातील खोडस या गावात आज उद्रेक दिसुन आला.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-24, अंबाजोगाई-8, आष्टी-55, धारुर-17, गेवराई-11, केज-12, माजलगाव-5, परळी-2, पाटोदा-11, शिरुर-31, वडवणी-7 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)
महाराष्ट्रातील परिस्थिती.
दरम्यान, गुरुवारी दिवसभरात राज्यात 07 हजार 756 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 07 हजार 302 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 120 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 60,16,506 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96 टक्क्यांजवळ पोहोचला आहे. सध्या राज्यात 05,51,882 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.