खुषखबर …. लहान बाळांनाही मिळणार लस; लवकरच येणार कॅप्सूल.

दि.27 मार्च – वर्षभरापुर्वी आलेल्या कोरोना विषाणूने बघताबघता संपूर्ण जगभर थैमान घातले. शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम घेवून यावर लस (Corona vaccine) तयार केली. मात्र ही लस देताना वयाची बंधने पाळण्यात आली. संपूर्ण जगभर लसीकरणही (Vaccination) सुरु झाले मात्र लहान बालकांना या लसीपासून दुरच ठेवण्यात आले. आता लहान बालकांसाठीही लस तयार करण्यात आली असून आगामी काळात ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
(The good news is that even small babies will get vaccinated; Capsules coming soon.)
‘लस द्या बाळा, कोरोना टाळा’चा नारा लवकरच ऐकायला मिळणार आहे. कोरोना लढ्यात अमेरिकेने मोठी खूशखबर दिली आहे. ‘फायजर’ औषध कंपनीने 12 वर्षांखालील मुलांसाठी कोरोना लस (Corona vaccine) तयार करून तिची चाचणीही सुरू केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही लस बाजारात येईल. वृद्धांपासून सुरू झालेली लसीकरण (Vaccination) मोहीम लहानग्यांपर्यंत आणण्यासाठी अमेरिकेने पहिले पाऊल टाकले आहे. त्यांना दोनऐवजी तीन डोस दिले जातील. मॉडर्ना कंपनीनेही सहा महिन्यांपर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठी चाचणी सुरू केली आहे.
कॅप्सूल आणण्याची तयारी
अमेरिकन कंपनी ‘फायझर’ने लसीपाठोपाठ आता कोरोनावर कॅप्सूल (Corona capsules) आणण्याची तयारी केली आहे. या गोळीच्या माणसावर चाचण्याही घेण्यात येणार आहेत. कंपनीचा दावा आहे की कोरोनाची लक्षणे दिसताच ही गोळी जर घेतली तर या आजाराचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत.
सध्या जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असली तरी तितक्याच वेगाने कोरोनाचा फैलावही सुरूच आहे. काही काळ रुग्णसंख्या घटल्याचे दिसते व पुन्हा संख्या वाढू लागते. त्यामुळेच प्रतिबंधात्मक लसीबरोबरच कोरोना रुग्णांवरील उपचार या दोन्ही गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे. कंपनीने म्हटले आहे की कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ नये यासाठी ही गोळी उपयुक्त ठरू शकते.
या कोरोनावरील गोळीमुळे (Corona capsules) प्राथमिक टप्प्यातच कोरोना रुग्णांना बरे होण्यासाठी मदत मिळू शकते. त्यामुळे महामारीवर बर्याच अंशी नियंत्रण मिळू शकेल. एप्रिलमध्ये या गोळीच्या दुसर्या व तिसर्या टप्प्यातील चाचण्या सुरू होणार आहेत. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडे या टॅबलेटच्या मंजुरीसाठी अर्ज केला जाईल. ही गोळी पाच दिवस, दिवसातून दोनवेळा घ्यावी लागेल. सुरुवातीला तरी ही गोळी कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांसाठी असेल. मात्र, निरोगी माणूसही ही गोळी घेऊन कोरोनापासून बचाव करू शकतो का, याबाबतही कंपनी संशोधन करणार आहे.