कोरोंना विशेष

धारुरमध्ये लसीकरणास सुरुवात… नगराध्यक्ष डॉ.हजारींनी घेतली पहिली लस

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) येथील ग्रामीण रुग्णालयात आज दि.२५ सोमवार रोजी कोव्हिड-१९ (Covid-19) लस (Vaccination) देण्यास सुरुवात करण्यात आली असून धारुर (Dharur) नगरीचे नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांनी सर्वप्रथम लस घेवून शुभारंभ केला.

दि.२३ रोजी कोव्हिड-१९ (Covid-19) ची लस धारुर (Dharur) तालुक्यासाठी उपलब्ध झाली. तालुक्यातील ५८३ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस (Vaccination) देण्यात येणार आहे. यात ग्रामीण रुग्णालय, नागरी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी, आशा स्वंयसेविका व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच आरोग्य सेवा देणाऱ्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही पहिल्या टप्प्यात ही लस देण्यात येत आहे. आज दि.२५ सोमवारी सकाळी ९ वाजता तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने, डॉ. मारुती लगड, डॉ. पुजदेकर, डॉ. दुबे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. दुपारी २ वाजे पर्यंत ७० जणांना लस देण्यात आल्याची माहिती डॉ. आदमाने यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!