महेबूब शेख यांना दिलासा… आ. रोहित पवारांनी साधला भाजपावर निशाना

मुंबईः दि.३१- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर महेबूब यांनी याबाबत पत्रकार परिषद घेवून खुलासा केल्यानंतर औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनीही (Police) महेबूब व फिर्यादी युवतीची वर्षभरात भेट नसल्याचा खुलासा केला. याप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या भाजप (BJP) कार्यकर्ते तोंडघशी पडले असून आ. रोहित पवार यांनी ट्विट करुन भाजपाला सुनावले आहे.

महेबूब यांच्या प्रकरणावरुन सुरुवातीला राष्ट्रवादीच्या (NCP) गोटात सन्नाटा पसरला होता. केवळ आ. जितेंद्र आव्हाड यांनी महेबूब यांच्या बद्दल प्रतिक्रिया देत पाठबळ दिले होते. मात्र अशातच काल औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणी आणि मेहबूब यांचा संपर्क नसल्याचं स्पष्ट केल आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबूब यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रथमच याप्रकरणी सविस्तर भूमिका मांडली आहे. मागील एक वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणलीय. त्यामुळे विरोधकांनी याप्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नये, अशा शब्दात रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला (BJP) सुनावलं आहे. प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे; पण महेबूब शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच (Police) केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करु नये, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आ. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही याप्रकरणावरुन आंदोलन करणाऱ्या भाजपवर जोरदार शरसंधान साधलं आहे. एखाद्याचे चारित्र्यहनन करून आसुरी आनंद लुटणाऱ्यानो हाथरस प्रकरणात तुमचे तोंड शिवले होते का रे? असा सवाल करत आ. मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!