नगर परिषद निवडणूकीच्या हालचालीना वेग; प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर.

बीड दि.22 फेब्रुवारी – महाराष्ट्रात नगर परिषद निवडणूकीच्या तयारीने आता वेग घेतला असून राज्यातील नगर परिषदांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. त्यानुसार आता 10 मार्च रोजी प्रारुप तर 1 एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहिर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणूक आता एप्रिल नंतर होणे अपेक्षित आहे.

( Speed ​​up the movement for municipal council elections; Ward formation program announced. )

महाराष्ट्रात नुकत्याच नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या. तर महापालिकांच्या प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ( State Election commission ) आज नगरपालिकांच्या प्रभागरचनेचे ( Ward ) आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे ( State Election commission ) 2 मार्चला पाठवायचा असून त्याची प्रसिद्धी 10 मार्च रोजी करावयाची आहे. त्यावर हरकती मागवून 1 एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहिर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम…
दि.2 मार्च प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे.
दि.7 मार्च प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्य मिळणे.

हरकती व सुचना
दि.10 मार्च – प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सुचना मागवण्यासाठी वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे.

दि.10 ते 17 मार्च – हरकती व सुचना मागविणे.
दि.22 मार्च – हरकती व सुचनावर सुणावणी.
दि.25 मार्च – हरकती व सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून संबंधित विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवणे.
दि.1 एप्रिल – अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!