आ. प्रकाशदादा सोळंके कोरोंटाईन…..

माजलगाव दि.४(प्रतिनिधी) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके हे आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार दहा दिवसांसाठी कोरोंटाईन होत असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
माजलगाव शहरात कोविड-१९ चा उद्रेक जाणवत आहे. दि.३ रोजी एकाच दिवसात ८ जन कोरोना पॉझिटीव्ह आली आहेत. यामुळे आ. सोळंके यांना आरोग्य विभागाने कोरोंटाईन होण्याचा सल्ला दिला. आ. सोळंके हे दि.५ ते १५ अॉगस्ट असे दहा दिवसा पर्यंत कोरोंटाईन राहणार आहेत. जनतेने आपल्या कामासाठी मोबाईल वरुन संपर्क करण्याचे अथवा स्विय सहाय्यक नाना नाटकर ९४२३१७१६७६, महादेव सोळंके ९०११११२०५७ व सय्यद वसीम ९९७०७५७४६० या व्हाट्सअप क्रमांकावर तक्रारी व निवेदन पाठवावे त्याची दखल घेवून प्रश्न सोडवली जातील असे आवाहन करण्यात आले आहे.