धारुर शहरात तरुणाची आत्महत्या

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) शहराजवळ असलेल्या कासारी फाटा येथील शेतवस्तीत एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज दि.४ शुक्रवार रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कामट नावाच्या भागात शेतवस्तीत राहणाऱ्या गळफास घेतलेल्या तरुणाचे दिपक सुभाष सांगळे (२५) असे नाव आहे. सदरील तरुण ट्रक चालक व मालक असून घरात झालेल्या घरगुती वादातून रागाच्याभरात रात्री त्याने शेतातील विहिरीजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांनी (Police) पंचनामा करत जबाब नोंदवले असून ठाण्यात आकस्मिक गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. येथील ग्रामीण रुग्णालयात मयत तरुणाचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.